Pimpri: महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदारांनाही 200 रूपये कमिशन द्यावे – गजानन बाबर

Pimpri: Rationing shopkeepers in Maharashtra should also pay a commission of Rs 200 demand by Gajanan Babar दिल्ली सरकार गहू, साखर व तांदूळ या धान्यावर प्रति क्विंटल 200 रुपये कमिशन देत असून आपले सरकार प्रति क्विंटल 150 रुपये देत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना लॅाकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना धान्य वितरण करण्याचे काम रेशनिंग दुकानदार करत आहेत. दिल्ली सरकार प्रति क्विंटल धान्यावर 200 रुपये कमिशन देते तर आपले सरकार 150 रुपये. हे कमिशन तुटपुंजे असून दिल्ली सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रातही रेशनिंग दुकानदारांना 200 रूपये कमिशन द्यावे अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी केली आहे.

बाबर यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

या पत्रात गजानन बाबर म्हणतात की, दिल्ली सरकार गहू, साखर व तांदूळ या धान्यावर प्रति क्विंटल 200 रुपये कमिशन देत असून आपले सरकार प्रति क्विंटल 150 रुपये देत आहे.

आपल्या सरकार द्वारे देण्यात येणारे कमिशन हे खूप तुटपुंजे असून यावर फेरविचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दोनशे रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.