Pimpri : श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने ‘कलम ३७०’ च्या रावणाचे दहन

एमपीसी न्यूज – अन्यायकारक ‘कलम 370’ च्या 31 फूट उंचीच्या रावणाचे दहन करून श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमी साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गावडे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी उपमहापौर राजू मिसाळ, नागरसेविका शर्मिला बाबर, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे , उपनिरीक्षक कोकाटे, उपनिरीक्षक मोरे तसेच लागीर झालं जी फेम महेश जाधव,निकेश ताकवणे आदी उपस्थित होते.

यावेळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी फ्युजन रामायण सादर केले. समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रचिती ग्रुप तर द्वितीय क्रमांक माहिवे ग्रुप आणि तृतीय क्रमांक दिवा ग्रुप, रॉकस्टार ग्रुप यांनी मिळवला.

तसेच बेस्ट ड्रेस आर्या उंब्रजकर , बेस्ट लुक सई जोशी , तर बेस्ट वॉक भारती पाटील यांनी बहुमान मिळवला. प्राधिकरण सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वर्षा सरमाने द्वितीय क्रमांक मानसी माळी आणि तृतीय क्रमांक शुभांगी समुद्र यांनी मिळवला.

या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी ज्योती कानेटकर , माधुरी ओक, श्रद्धा कपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like