Pimpri : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी रविराज साबळे यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविराज रघुनाथ साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाविद्यालयीनपासून रविराज साबळे हे गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

आजपर्यंत त्यांनी फासा विद्यार्थी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष, वंदे मातरम् संघटना पिंपरी चिंचवड शहर जिल्हाप्रमुख तसेच अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडशहर उपाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पर्यावरण विभाग) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच भंडारा जिल्हा प्रभारीसह अनेक जबाबदा-या आजपर्यंत त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

आजपर्यंत त्यांनी विविध विषयांवरील चर्चासत्रे, माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती, मतदान जनजागृती, समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. तसेच  आरोग्य शिबीरे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, समाजातील वंचित – दुर्लक्षित घटकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक कार्ये आजपर्यंत केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दाखल घेऊन निवड केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.