Pimpri: रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !  शहरात आज 547 रुग्णांची नोंद, 324 जणांना डिस्चार्ज, 17 मृत्यू

Record-breaking patient growth! The city recorded 547 patients today, 324 discharged, 17 died

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 501 आणि शहराबाहेरील 46 अशा 547 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली. आजपर्यंतची ही  उच्चांकी रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 324  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या नऊ हजार पार झाली असून ही संख्या 9104 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहननगर- चिंचवड येथील 63 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 65 वर्षीय महिला, आकुर्डीतील 25 वर्षीय युवक,  मिलिंदनगरमधील 63 वर्षीय महिला, चिंचवडयेथील 76 वर्षीय वृद्ध, नवी सांगवीतील 70 वर्षीय वृद्ध,  थेरगांवतील 65 वर्षीय पुरुष, तळवडेतील 64 वर्षीय महिला, मोशीतील 65 वर्षीय महिला, निगडीतील 73 वर्षीय वृद्ध महिला  आणि 59 वर्षीय पुरुष,  यमुनानगरमधील 76 वर्षीय वृद्ध महिला, चिंचवड येथील 48 वर्षीय पुरुष आणि  चाकण येथील 57 वर्षीय पुरुष, तळेगाव रोड येथील 58 वर्षीय पुरुष, कात्रजमधील 77 वर्षीय वृद्ध, महाबळेश्वर येथील 77 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 9104 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 5559  जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 156 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 49 अशा 205 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2337 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 2203

# पॉझिटीव्ह रुग्ण – 547

#निगेटीव्ह रुग्ण – 1295

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1675

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2337

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1559

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 8603

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2337

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 205

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 5559

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25059

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 81245

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.