Pimpri:  ‘रेकॉर्डब्रेक’ रुग्णवाढ ! शहरात आज तब्बल 927 नवीन रुग्णांची नोंद

'Recordbreak' patient growth! As many as 927 new patients were registered in the city today : 203 जणांना डिस्चार्ज,  15 जणांचा मृत्यू

एमपीसीन्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 886 आणि  शहराबाहेरील 41  अशा   927 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली. आजपर्यंतची ही  सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 203 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान,  शहरातील रुग्णसंख्या तेरा हजार पार झाली असून 13107 वर पोहोचली आहे.

आज 15 जणांचा मृत्यू झाला आहे. काळेवाडीतील 60 वर्षीय महिला, नेहरुनगरमधील 75 वर्षीय वृद्ध महिला, 60 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 63 वर्षीय पुरुष,  थेरगांवतील 56 वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडीतील 50 वर्षीय महिला,  पिंपळेगुरव मधील 75 वर्षीय वृद्ध,  पुनावळेतील 38 वर्षाचा युवक, मोरवाडीतील 67 वर्षीय पुरुष,  रहाटणीतील 58, 43 वर्षीय असे दोन पुरुष,  आकुर्डीतील 62 वर्षीय पुरुष आणि  जुन्नर येथील 80 वर्षीय वृद्ध महिला, चाकण येथील 49 वर्षीय पुरुष,  स्वारगेट येथील 56 वर्षीय महिलेचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 13 हजार 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 8014  जण बरे होऊन घरी गेले आहेत.  शहरातील 238 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या  63 अशा 301 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3379 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 4437

# पॉझिटीव्ह रुग्ण -927

#निगेटीव्ह रुग्ण – 3187

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2062

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3379

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3700

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -13,107

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3379

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -301

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -8014

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 28148

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 92208

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.