Pimpri: अराजपत्रित पदांची भरती एमपीएससी मार्फत करा, ‘आप’ युवा आघाडीची मागणी

Pimpri: Recruitment of Non-Gazetted Posts through MPSC, Demand of 'Aap' Youth Front राज्यातील अराजपत्रित पदांची भरती खासगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोर्टलद्वारे न करता एमपीएससी द्वारेच करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यातील अराजपत्रित पदांची (वर्ग 1 ते 4) भरती प्रक्रिया एमपीएससी द्वारे करण्यात यावी अशी मागणी ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे.

याप्रसंगी ‘आप’ युवा आघाडी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन बेंद्रे, आशुतोष शेळके, मोहसीन गडकरी, सोहम नारखडे आदी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. राज्यातील अराजपत्रित पदांची भरती खासगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोर्टलद्वारे न करता एमपीएससी द्वारेच करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगला विचारणा केली असता एमपीएससीने देखील भरती प्रक्रिया घेण्याबाबत तयारी दर्शवली आहे. प्रशासन स्तरावर पुढील निर्णय घेऊन एमपीएससीला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी ‘आप’ युवा आघाडीने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.