Pimpri: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळणार; कामगार नेते इरफान सय्यद यांच्या मागणीला मोठे यश

एमपीसी न्यूज – कामगारांचे  हातावरचे पोट असून लॉकडाऊनमुळे हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.  त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना दहा हजार रुपये देण्याची मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड-आळंदी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने नोंदणीकृत 12 लाख कामगारांना दोन टप्यात पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सय्यद यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. त्यांच्यामुळे लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे  नोंदणीकृत बांधकाम  घरी बसून आहेत.  या कामगारांचे  हातवरचे पोट आहे. लॉकडाऊनमुळे हजारो  कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र माथाडी, मापाडी, हमाल श्रमजिवी व असंरक्षीत कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत येणा-या नोंदीत कामगारांना माथाडी मंडळाकडे जमा असणा-या शिल्लक करोडो रूपयांच्या निधीतून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. त्याबाबतचे आदेश माथाडी मंडळांना द्यावते,  अशी विनंती  सय्यद यांनी राज्य सरकारकडे केली होती.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवेदन पाठविले. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.  त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. 12 लाख नोंदणीकृत  बांधकाम कामगारांना दोन टप्यात पाच हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातून बांधकाम  कामगारांचा उदरनिर्वाह भागण्यास हातभार लागेल, असे कामगार नेते इरफान सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.