Pimpri : शाळेचं पुनर्वसन करा, झोपडपट्टी पुनर्वसनाची गरज पडणार नाही – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज –  शाळांचे पुनर्वसन केले तर झोपडपट्टी पुनर्वसनाची गरज पडणार नाही, कारण (Pimpri) शाळेत शिस्त व संस्कार झाले तर मुले वाईट मार्गांकडे वळणारच नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

अग्रवाल यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेचे शाळा असेल किंवा जिल्हा परिषदेची शाळा तिथे तुम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षक दिसणार नाही, शाळेला चांगले खेळाचे मैदान नसणार, शाळेत चांगली लायब्ररी नसेल, प्रयोग शाळा नसेल, शिकवण्याचे नवीन तंत्रज्ञान नसेल. सर्व शाळेत घाण स्वच्छता गृह दिसतील, ह्या सर्व शाळा शिस्त नसलेल्या शाळा असेच चित्र दिसते. आज पुण्यात व पिंपरी चिंचवड भागात अनेक चांगल्या खाजगी शाळा आहेत, ज्ञानप्रबोधिनी सारखी चांगली शैक्षणिक संस्था आहे, जे देशाचे उत्तम नागरिक घडवतात.

जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने  प्रत्येक झोपडपट्टी भागात अश्या अत्याधुनिक शाळा गरीब व गरजू साठी मोफत सुरू केल्या तर किती मोठी क्रांती होईल. झोपडपट्टी मधून गुंड, चोर, दरोडेखोर नाही तर चांगले आय ए एस ऑफिसर, डॉक्टर, सी ए, वकील आणि त्या पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे चांगले नागरिक बाहेर येतील.

HSC Exam : बारावीची पुरवणी परीक्षा जुलै मध्ये होणार

सरकार कडे मोठे मोठे पूल तयार करण्यासाठी पैसे आहेत, शहर सुशोभित करण्यासाठी पैसे आहेत, मग चांगली शाळा का नाही? आय आय टी, आय आय एम, एम्स, सी ओ इ पी अश्या अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था सरकार मार्फत उत्तम रित्या चालवल्या जातात. आज पुण्यात व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण विभाग फक्त घोटाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. महानगरपालिकेच्या शाळेचे पुनर्वसन करा भविष्यात चोऱ्या माऱ्या कमी होतील, झोपडपट्टी मधून उच्च शिक्षित चांगले नागरिक तयार होतील. भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची गरजच पडणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले (Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.