Pimpri: गांधीनगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन होणार

नगरसेविका गीता मंचरकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी, गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. नागरिकांना 500 स्क्वेअर फुटांची घरे मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी – चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन आपर्यंत झाले नाही. या ठिकाणी शेकडो नागरिक राहतात. गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिल्यानुसार सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येत आहे. शहर सुधारणा समिती मध्येही ठराव केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे पूर्णतः झोपडपट्टी मुक्त व्हावे, हे शहराचे मुख्य उद्दिष्ट आहे, तसेच झोपडपट्टीवासियांना उच्चस्तरीय राहणीमान मिळावे, त्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षण मिळावे, स्वतःच्या मालकीचे घर व्हावे, हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. तेथील झोपडपट्टीवासीयांना सर्व लाभ मिळावा, अशी मागणीही मंचरकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.