Pimpri : निराधार जखमी वृद्धाचे मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमात पुनर्वसन

एमपीसी न्यूज – ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ असे कवी म्हणतो. याचाच प्रत्यय एका वृद्धाला आला आणि त्याचा देवावरील विश्वास आणखी दृढ झाला. अपघातामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या या वृद्धावर उपचार झाले पण या निराधार व्यक्तीला गरज होती एका आधाराची. अखेर रिअल लाईफ पीपल, रीअल लाईफ संस्थेने या वृद्धांचे चिंचवड येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये पुनर्वसन केले.

विद्यानगर येथील ही घटना. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगणारे ७६ वर्षीय हिरामण देडे यांना एके दिवशी अपघात झाला. अपघातानंतर एका नागरिकाने 108 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर देडे यांना पिंपरीच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाले पण हिरामण देडे यांना खरी गरज होती आधाराची. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असता रिअल लाईफ पीपल, रीअल लाईफ या सामाजिक संस्थेने चिंचवड मधील मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमात त्यांचे पुनर्वसन केले. आणि हिरामण देडे यांना मोठा आधार गवसला.

  • गेल्या पाच महिन्यापासून अत्यंत निरलस भावनेने एकही पैसे न घेता देडे यांची सेवा करण्यात आली. वृध्दाश्रमाचे संस्थापक सुहास गोडसे व वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. आता हिरामण देडे हे पूर्ण बरे झाले असून ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले.

मागील १२ वर्षांपासून चिंचवड येथे सुहास गोडसे व त्यांचे कुटुंबीय हे वृद्धाश्रम चालवत असून आजपर्यंत कोमामधील चार रुग्णाची सेवा करून त्यांना बरे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like