Pimpri: खड्डे बुजवा, पूलाखालील अतिक्रमण हटवा; महापौर राहुल जाधव यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डयांची डागडुजी करावी. क्रांतीवीर चापेकर पुतळ्यासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटविण्यात याव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना केल्या आहेत.

प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये महापौर जाधव यांनी केले आहे. आज ‘ब’ प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II
  • यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, माधुरी कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, निता पाडाळे, उषा काळे, स्वीकृत सदस्य ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटील, चंद्रशेखर धानोरकर, मुख्यउद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ लिपिक रमेश भोसले बैठकीला उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, शहर विकासासाठी पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविकांच्या येणा-या सूचना विचारात घेऊन विकास कामे करण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावेत. कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरावाहतूक गाड्या वाढविण्यात याव्यात. विसर्जन घाटावरील कामकाज पुर्ण करणे, स्मशानभूमी, स्मशानघाटाचे कामकाज पुर्ण करावे.

  • मोकाट फिरणा-या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, पाणीपुरवठा सुरळीत करावा. रस्त्यावरील खड्यांची डागडुजी करणे, प्रभागातील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावे. भाजीमंडई स्वच्छ ठेवणे. प्रभागातील बीआरटीएस वाहतूक ताबडतोब चालू करावी. चापेकर पुतळ्यासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे. काळेवाडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याची सूचना महापौर जाधव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.