Pimpri : सुप्रसिध्द पार्श्वगायक, संगीतकार शांतनू मुखर्जी यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड ( Pimpri ) शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत ‘आशा भोसले पुरस्कार’ सुप्रसिध्द पार्श्वगायक, संगीतकार शान (शांतनू मुखर्जी) यांना प्रदान करण्यात आला.

सन्मान चिन्ह, 1 लाख 11 हजार रुपये रोख, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा 20 वे वर्ष आहे. दरवर्षी देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारास हा पुरस्कार दिला जातो. रविवारी (दि. 11) भोईरनगर येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Khadki : संशयातून आईचा गळा चिरून केला खून , मुलाला शिर्डी येथून अटक

गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार सोहळ्यादरम्यान शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत “रजनीगंधा” हा कार्यक्रम ( Pimpri ) सादर झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.