Pimpri : वायसीएममधील ‘त्या’ प्रकाराबाबत रुग्णास नुकसानभरपाई द्या; युवराज दाखले यांची मागणी

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण रूग्णालयामधील गलीच्छ प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर आणि मुख्य व्यवस्थापकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून, त्या रुग्णाला तात्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य करदात्यांंकरीता तसेच सर्वसामान्य जनतेसाठी सरकारी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांचा निर्दयपणा आणि बेजबाबदारपणा वाढत चाललेला आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची रुग्णालय समिती गठीत करणे गरजेचे आहे.

  • नुकत्याच घडलेल्या गंभीर प्रकरणातील रुग्ण आनंद अनिवाल याच्यावर चुकीच्या प्रकारे केलेल्या उपचाराचा खर्च आणि नुकसानभरपाई तात्काळ पाच दिवसांच्या आत देण्यात यावी. अन्यथा, शिवसेना स्टाईलने आपल्या दालनात आंदोलन केले जाईल. याकामी उदभवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली आणि आपल्या प्रशासनाची राहील, असे या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.