Pimpri: भारत भूमीवरील चीनचे अतिक्रमण परतवून लावा – सचिन साठे

Repeal China's encroachment on Indian soil - Sachin Sathe

पिंपरीत काँग्रेसच्या वतीने ‘शहीदोंको सलाम’

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात भारत – चीन सीमारेषेवर गलवान खो-यात चीनी सैनिकांनी भारतीय भुभागावरील अतिक्रमण केले. ते परतवून लावताना झालेल्या चकमकीत वीस भारतीय जवानांना वीरमरण आले. जवानांचे हे वीरमरण व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर, केंद्र सरकारने चीनी सैनिकांनी गलवान खो-यात केलेले अतिक्रमण सर्व शक्तीनिशी परतवून लावावा आणि आपला भुभाग परत मिळवावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे, असे  काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

गलवान खो-यात वीरमरण आलेल्या वीस भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज देशभर कॉंग्रेसच्या वतीने ‘शहिदोंको सलाम’ या कार्यक्रमातून श्रध्दांजली वाहण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

त्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते दोपोडीतील शहीद भगतसिंग पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, विष्णूपंत नेवाळे, परशूराम गुंजाळ, प्रदेश युवक पदाधिकारी मयूर जयस्वाल, चंद्रशेखर जाधव, हिरामण खवळे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, भाऊसाहेब मुगूटमल, सुनिल राऊत, शैलेश अनंतराव आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थितांनी वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.