Pimpri: सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी परिसरातील 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

13 persons tested positive for Coronavirus in PCMC. These covid19 patients are from Sangvi, Pimpri, Thermax Chowk, Sainathnagar Nigdi, Dighi area. परी-चिंचवड शहरातील सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी  परिसरातील 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी या परिसरातील 13 जणांचे आज (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, महापालिका हद्दीबाहेरीलही शिरूर, मावळमधील 3 जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासाणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी  परिसरातील 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत.

त्यामध्ये 9 पुरुष आणि  4 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरीलही शिरूर, मावळ मधील 3 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

तर, आज आंनदनगर, बौद्धनगर, काळेवाडी, पिंपरी, वाकड, चिखलीतील काही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आत्तापर्यंत शहरातील 535 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  218 सक्रिय रुग्णांपैकी महापालिका रुग्णालयात आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरातील 33 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 276 जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील आठ तर हद्दीबाहेरील 12 जणांचा अशा एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 89

# पॉझिटीव्ह रुग्ण – 13

#निगेटीव्ह रुग्ण – 179

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 97

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 367

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 187

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 535

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 218

# शहरातील कोरोना बाधित 33 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  20

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 276

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23557

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 65578

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.