Pimpri: बौद्धनगर, आनंदनगर, रमाबाई नगर, भोसरी, कासारवाडी, वाकड, नेहरुनगर, दापोडीतील 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; 19 जणांना डिस्चार्ज

Report positive of 16 persons from Bouddhanagar, Anandnagar, Ramabai Nagar, Bhosari, Kasarwadi, Wakad, Nehrunagar, Dapodi; Discharge of 19 persons

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि  दापोडी परिसरातील 16 जणांचे आज (शनिवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, महापालिका हद्दीबाहेरील चिंचोली, परंदवाडी, पाईट येथील
तिघांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आज कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि नारीकडे  पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि  दापोडीतील परिसरातील 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 13 पुरुष आणि  3  महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरील चिंचोली, परंदवाडी, पाईट येथील एक पुरुष आणि दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बौद्धनगर, रुपीनगर, वाकड येथील 19 जण आज बरे झाले आहेत. त्यामळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आत्तापर्यंत शहरातील 513 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  256 सक्रिय रुग्णांपैकी महापालिका रुग्णालयात 222 आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील 32 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 249  जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील आठ तर हद्दीबाहेरील 12 जणांचा अशा एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 112

# पॉझिटीव्ह रुग्ण – 16

#निगेटीव्ह रुग्ण – 96

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 259

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 549

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 111

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 513

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 256

# शहरातील कोरोना बाधित 32 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  20

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 249

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26815

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 80413

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.