Pimpri: आनंदनगर, बौद्धनगर, थेरगाव, बजाज ऑटो कॉलनी, किवळे परिसरातील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; गोखलेनगरमधील रुग्णाचा YCMH मध्ये मृत्यू

Report positive of 20 people from Anandnagar, Bouddhanagar, Thergaon, Bajaj Auto Colony, Kiwale area; Patient from Gokhale Nagar dies in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, बौद्धनगर, थेरगाव, बजाज ऑटो कॉलनी, किवळे परिसरातील 20 जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, महापालिका हद्दीबाहेरीलही तीन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 20 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. तर, पुण्यातील गोखलेनगर येथील कोरोना बाधित रुग्णाचा महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज मृत्यू झाला आहे.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासाणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे सायंकाळी रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, बौद्धनगर, थेरगाव, बजाज ऑटो कॉलनी, किवळे परिसरातील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत.

त्यामध्ये सात पुरुष आणि  सहा महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. आणखी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच महापालिका हद्दीबाहेरीलही तीन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

पुण्यातील गोखलेनगर येथील रहिवासी असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबळींची संख्या 18 वर गेली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील 11 तर शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत शहरातील 471 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 253 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महापालिका रुग्णालयात 227 आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरातील 28 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील 20 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 211 जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 113

# पॉझिटीव्ह रुग्ण – 20

#निगेटीव्ह रुग्ण – 20

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 242

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 509

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 71

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 471

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 253

# शहरातील कोरोना बाधित 28 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  18

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 211

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 28696

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 85733

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.