Pimpri: आनंदनगर, भाटनगर, रुपीनगर, वाकड, वाल्हेकरवाडी, पिंपरी, कासारवाडी, भोसरी परिसरातील 37 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

Report positive of 37 people from Anandnagar, Bhatnagar, Rupinagar, Wakad, Walhekarwadi, Pimpri, Kasarwadi, Bhosari area

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, रुपीनगर, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, भाटनगर परिसरातील 37 जणांचे आज (मंगळवारी) आत्तापर्यंत रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शिवाय आंबेगाव येथील रहिवाशी पण महापालिका रुग्णालयात दाखल दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते.  हे रिपोर्ट सायंकाळी  आले आहेत.

त्यामध्ये आनंदनगर, रुपीनगर, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, भाटनगर परिसरातील 37 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

रिपोर्ट 15 पुरुष आणि 19 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आणखी तिघांनाही बाधा झाली आहे.

याशिवाय आंबेगाव येथील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  तर,  च-होलीतील  तिघेजण  कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आत्तापर्यंत शहरातील 427 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 245 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महापालिका रुग्णालयात 220 रुग्णांवर तर खासगी रुग्णालयात काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरातील 24 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील 33 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 175 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.