Pimpri: संभाजीनगर, रुपीनगर, तळवडे, सांगवी, मोशीतील 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; 2 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण

आजपर्यंत 141  जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर, रुपीनगर, तळवडे, सांगवी, मोशीतील आणखी नऊ जणांचे आज (मंगळवारी) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तसेच वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पुण्यातील एका रुग्णाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 65 वर पोहचला आहे. तर, शहरातील 131 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 141 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण 52 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने सोमवारी (दि. 4) 115 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये संभाजीनगर येथील दोन महिन्याची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा आणि 61 वर्षीय पुरुष, कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या रुपीनगर येथील 11 आणि 27 वर्षीय महिला, तळवडेतील 37 वर्षीय पुरुष, सांगवीतील 37 वर्षीय महिला , 74 वर्षीय पुरुष आणि मोशीतील एक अशा शहरातील नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत तर, पुणे शहरातील रहिवासी पण पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 70 वर्षीय पुरुषाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 141  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 52 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 65 रुग्णांवर आणि शहरातील 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24)  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, बुधवारी (दि.29) खडकीतील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा पाच जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.