Pimpri : वंडरलैंड स्कूलमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज- ओम प्रतिष्ठान संचालित वंडरलैंड स्कूलमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गाणी, नृत्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत असलेले बालगोपाळ यांनी वातावरण उत्साहित झाले होते.

यावेळी रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ हरपुडे व सी ए किशोर जाधव उपस्थित होते. अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी पालक तसेच मुलांना पाण्याचे महत्व प्रदूषण, प्लास्टिक समस्या, वाहतुकीचे नियम अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन अक्षय पिंपले यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता सावंत यांनी आभार व्यक्त केले. वंडरलैंडच्या सर्व टीमचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.