Pimpri: तीनच दिवसात भाजप नेत्यांच्या आनंदावर विरजण, नेत्यांचे चेहरे हिरमुसले !

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांना फोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने शहर भाजपमध्ये आनंदाचे उधाण आले होते. परंतु आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने शहरातील भाजप नेत्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नेत्यांचे चेहरे हिरमुसले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांना फोडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी (दि. 23) भल्या पहाटे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शहर भाजपने जल्लोष केला होता. शहरातील भाजप नेत्यांना मंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले होते. कोणाला महामंडळाचे स्वप्न पडू लागले होते. परंतु, तीन दिवसातच त्यांच्या स्वप्नावर आणि आनंदावर विरजण पडले आहे.

अजित पवार यांनी आज (मंगळवारी) दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस यांनी देखील आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शहर भाजपचे नेते, कार्यकर्ते यांचे चेहरे हिरमुसले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.