Pimpri: उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानिमित्त ‘बांधकाम’ विभागाचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने 2019-2020 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे उद्दिष्ट संपण्याअगोदरच पूर्ण केले आहे. बांधकाम विभागाला 350 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. डिसेंबर 2019 अखेर बांधकाम विभागाने 520 कोटी 83 लाख रुपयांचे उत्पन्न बांधकाम परवानगीतून मिळविले आहे. त्यानिमित्त स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते बांधकाम विभागातील अधिका-यांचा (बुधवारी) सत्कार करण्यात आला.

सन 2019-20 च्या अंदाजपत्रकामध्ये बांधकाम परवानगी विभागास जमेचे उदृदीष्ट 350 कोटी देण्यात आले होते. 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या 9 महिन्याच्या कालावधीत महापालिकेचे बांधकाम परवानगी विभागास 520.83 कोटी उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी 1 एप्रिल 2018 ते 31 डिसेंबर 2018 अखेर मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेने 221.26 कोटीने वाढ झाली आहे.

तसेच 14 जानेवारी 2020 अखेर 541.70 कोटी उत्पन्न मिळाले आहे. सन 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये देण्यात आलेल्या जमेचे उदृदीष्ट 350 कोटी हे ऑक्टोंबर 2019 या सात महिन्याच्या कालावधीतच पूर्ण केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात विक्रमी भरीव वाढ झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमताच अंदाजपत्रकातील उदृदीष्ट सात महिन्यातच पूर्ण केलेला बांधकाम परवानगी विभाग हा एकमेव विभाग आहे.

या विशेष उत्पन्न वाढीबदृल सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, राजेंद्र राणे, श्रीरिष पोरेड्डी यांचा आणि विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांचा उत्कृष्ट कार्यक्षमतेबदृल गौरवपत्राची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.