Pimpri: ‘राष्ट्रवादी’च्या  वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरांना प्रतिसाद

Response to blood donation camps organized on the occasion of NCP's anniversary

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर संघटनेने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने  शिबिरांमध्ये सहभाग नोंदवून रक्त संकलन अभियानात आपले योगदान दिले.

वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेने रक्तदान करावे आणि सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

‘कोरोना’ च्या साथीमुळे राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी कर्तव्य भावनेतून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पिंपरीगाव, वाकड,आकुर्डी, निगडी, उद्यमनगर, भोसरी, चऱ्होली  लालटोपीनगर, मोरवाडी अशा  विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली.

शहरातील विविध भागात पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते  नाना काटे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख,  राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर,  राष्ट्रवादी विद्यार्थी  अध्यक्ष सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल काळभोर, प्रदीप गायकवाड, महेश झपके आदी  यांनी भेटी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.