Pimpri : मातंग समाजाच्या श्रध्दांजली सभेत पोलिसांचा मज्जाव; कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांचा आंदोलन हुसकावून लावण्याचा प्रयत्न; सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज – मातंग समाजाच्या १३ टक्के आरक्षणातून लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ‘अ’, ‘ब,’ ‘क’, ‘ड’, करून स्वतंत्र आरक्षण मागणीच्या लढ्यात बीड जिल्ह्यातील संजय ताकतोंडे यांनी जलसमाधी घेतली. आज सकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवी साखळीतून श्रध्दांजली अर्पण करताना पोलिसांनी मज्जाव केला. शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांच्यासह मातंग समाजाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

या आंदोलनात मानवी साखळीद्वारे लोकशाही पध्दतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनातील महिलांना आरेरावीची भाषा वापरली. त्यांचा आपमान केला. लोकशाहीच्या अधारे चाललेल्या मानवी साखळीला खिळ घालण्याचे काम पोलिसांनी केले. पोलिसांच्या भूमिकेमुळे आंदोलन करणारे प्रमुख पदाधिकारी आक्रमक झाले. पोलिसांनी हे आंदोलन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्त सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

यावेळी देवेंद्रजी फडणविस यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. तसेच, संजय ताकतोंडे यांच्या कुटूंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष दाखले यांनी केली. यावेळी भाऊसाहेब आडागळे, आरूण जोगदंड, भाजपाचे किशोर हतागळे, संजय ससाने, धनंजय भिसे, शिवाजी साळवे, बापू घमारे, नितीन घोलप, हनुमंत कसबे, दत्तु चव्हाण, विशाल कसबे, आशा शहाने, भिमा वाघमारे, गणेश आहेर, मारूती म्हस्के आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.