Pimpri : बंदीत सुद्धा मागवता येणार ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना देण्यात आली असून, हॉटेल व रेस्टोरंटमध्ये खाद्यपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. परंतू, जीवनाश्यक वस्तु विषयक आस्थापना सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यामुळे नागरीकांना ऑनलाईन पद्धतीने गरजेनुसार खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेवून रेस्टॉरंटमध्ये खादयपदार्थ बनवून देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व हॉटेल व छोटे व्यावसायिक यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने किंवा भ्रमणध्वनीवरुन खाद्यपदार्थाची मागणी केल्यास होम डिलिव्हरी स्वरूपात पार्सल वितरीत करणेत यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

तसेच, विदयार्थ्यासाठी खानावळ, महाविदयालय व वस्तीगृह यामधील उपहारगृह तथा मेस सूरू ठेवल्या जाव्यात. दूध, किराणा दुकाने, फळे व भाजीपाला मार्केट, औषध उत्पादक व मेडिकल, मटन, चिकन, मासे यांची दुकाने, मॉल मधील जीवनाश्यक वस्तू किराणा दुकाने, दुध, फळे व भाजीपाला विक्री साठी सूरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.