Pimpri : नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढ धोरणाबाबत फेरविचार करा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंंचवड शहर महापालिकेच्या (Pimpri) अखत्यारीत येणाऱ्या नाटयगृहांच्या भाडे आकारणीमध्ये वाढ केली असून तारखांचे आॕनलाइन पद्धतीने नोंदणी वाटप करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून सुरु होईल असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील आमच्या सुचना आयुक्त साहेबांनी विचारात घ्यावा, असे मत अमित गोरखे यांनी व्यक्त केले. 

नाटयगृहांच्या तारखांचे आॕनलाइन पद्धतीने वाटप झाल्यास बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागेल. एकांकिका, नाटके, बालनाटये, गाण्यांचे तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठरलेली तारीख मिळणे अवघड होईल. यात आयोजकांच्या नुकसानाबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड होईल.

नाट्य कलाकारांच्या तारखा मिळाल्यानंतरच नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगांच्या तारखा सुनिश्चित केल्या जातात. त्यानुसार प्रयोगादरम्यान लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. अशा वेळेस मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय तर होतेच शिवाय आर्थिक नुकसानही सोसावे लागते.

Maval : मावळ लोकसभा भाजप की शिंदे गट लढविणार?, बाळा भेगडे म्हणाले…

नाट्यगृहाच्या भाडेवाढीस आमचा विरोध नसून होणारी भाडेवाढ ही अवास्तव असू नये. नाट्यव्यावसायिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक यांना परवडणारे दर असावेत तसेच नाट्यप्रयोगासाठी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम भरण्याचे प्रस्तावित आहे ते शक्य होणार नाही. याचा फेरविचार करावा.

नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करतांना शनिवार आणि रविवार येणाऱ्या तारखा नाटकांसाठी प्राधान्याने देण्यात याव्या. या मागचा उद्देश हा की या दोन दिवशीच नाटकांना प्रेक्षकांची उपस्थिती जास्त असते. तसेच नाट्यगृहाकडून दिलेल्या तारखा या काहीही कारण न देता काढून घेतल्या जातात. अशा अनाकलनीय कारभाराला यामुळे आळा बसावा हा त्यामागचा उद्देश आहे.
नाट्यगृहांमध्ये नियुक्त केलेले अधिकारी हे त्या क्षेत्रातील जाणकार असावेत.

आवश्यकता वाटल्यास यासंदर्भात नाट्यव्यावसायिक व महापालिका (Pimpri) अशी संयुक्त बैठक घ्यावी. पिंपरी – चिंचवड महापालिकेने कायम नाट्य क्षेत्रासाठी, स्थानिक कलाकारांसाठी पोषक व सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, असेही गोरखे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.