Pimpri : ‘टाटा मोटर्स’चे निवृत्त अधिकारी करंकरा नारायण मेनन यांचे निधन

Retired Tata Motors executive Karankara Narayan Menon passes away

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीचे निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी व चिंचवड प्रवासी संघाचे मार्गदर्शक करंकरा नारायण मेनन यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी, दि. 7) निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

मुळचे दक्षिणात्य असलेले मेनन नोकरी निमित्त चिंचवड येथील पारिजातबन येथे स्थानिक झाले होते. तसेच पिंपरी (टेल्को) टाटा मोटर्समध्ये उच्च अधिकारी पदावरून ते सेवा निवृत्त झाले होते.

मेनन यांनी कंपनीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्यक्तिशः जावून आयटीआयमधील शेकडो होतकरु युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

सन 1990 ते 2015 दरम्यान चिंचवड प्रवासी संघाचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहून चिंचवड येथे एक्सप्रेस गाड्या थांबविण्यासाठी मेनन यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

परिसरातील युवकांना सतत मार्गदर्शन करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रबोधन केले.

पारिजात बन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. लाजू मेनन यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.