Pimpri : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन कोटी 29 लाख 59 हजार रुपयांचा महसूल जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी (Pimpri)प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. लोक अदालत मध्ये दोन कोटी 29 लाख 59 हजार रुपयांचा महसूल जमा झाला. एकूण तर 663 खटले निकाली निघाले.

कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे,(Pimpri) एन. आर. गजभिये तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व न्यायदेवतेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतिक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदिप तापकिर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. आयाज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मिनल दर्शले, बारचे सभासद ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सारिका परदेशी, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. शंकर घंगाळे आदी वकिल बांधव तसेच राणी पुतळाबाई कॅालेजच्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

नेहरूनगर येथील न्यायालयात विविध प्रकारचे 329 दावे निकाली काढण्यात आले. यामध्ये 47 हजार 800 रुपये महसूल जमा करण्यात आला. तसेच आकुर्डी येथील न्यायालयात पाणीपट्टी आणि मिळकत कराची एकूण 334 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून दोन कोटी 29 लाख 12 हजार रुपयांचा महसूल जमा झाला.

या वेळी लोक आदालत मध्ये जास्तीत जास्त खटले निकाली निघावे यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. संगीता परब यांनी यांनी उपस्थित नागरिक व खटल्याचे काम पाहणारे वकिलांना समजुतीने ही सर्व प्रकरणे निकाली निघावी असे आवाहन केले. लोकअदालत मध्ये पॅनल जज म्हणून ॲड. आस्मा मुजावर, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. संघर्ष सुर्यवंशी यांनी भाग घेतला. तसेच सर्व कमिटीने आकुर्डी न्यायालयास भेट देऊन तेथील न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांची भेट घेऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली.

तळवडे आग प्रकरणात होरपळून मृत्यू झालेल्या तसेच उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या निष्पाप महिलांना उपस्थित न्यायाधीश व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी केले. उपाध्यक्ष ॲड. प्रतिक्षा खिलारी यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.