Pimpri : आपत्ती व्यवस्थापन कक्षातील महसूल कर्मचाऱ्यांना मिळाले सुरक्षा कीट

एमपीसी न्यूज : आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत तलाठी, कोतवाल व मंडल अधिकारी व कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करतात. त्यासाठी त्यांना तक्रार आलेल्या भागात जाऊन काम करावे लागते. अशावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या वतीने पीपीई कीट, फेसशिल्ड मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, इन्फ्रारेड थर्मामिटर आदी सुरक्षा साहित्य देण्यात आले.

तहसीलदार गीता गायकवाड यांच्या वतीने तहसील कार्यालयात या साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. तसेच प्रत्येक कर्मचारी व महसूल मित्र यांच्यासाठी आरोग्य तपासणीसाठी उद्या ( शनिवारी) दुपारी २ वाजता रावेत येथील निवृत्ती लॉन्स येथे  शिबिराचे आयोजन केले आहे. दरम्यान, पुणे जिल्हामध्ये प्रथमच महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे तहसीलदार आपल्याला लाभले, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश सोमवंशी यांनी व्यक्त केले.

नायब तहसिलदार अंकुश आटोळे, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, तलाठी अर्चना रोकडे, रूपाली परिहार, मारूती पवार,अजय चडचणकर, कोतवाल जगताप तसेच तहसील कार्यालयातील लिपिक भावना पवार, अनिल घोडके, शोभा गिऱ्हे आदींसह अन्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मजुरांची जेवणाची व्यवस्था अथवा अन्य तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विविध ठिकाणी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कीटमुळे संरक्षण मिळाले आहे.  गीता गायकवाड : तहसीलदार, अप्पर पिंपरी चिंचवड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.