Pimpri: शिक्षण समितीचे सदस्य पारित प्रस्ताव फेरसादर करा, स्थायी समितीचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक, शिक्षणतज्ज्ञांची नियुक्ती, सातवीतील विद्यार्थ्यांना टॅब खरेदी, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्याकरिता स्वच्छताकिट खरेदी करण्याचे प्रस्ताव मंजूर केले. मात्र, त्याला स्थायी समितीने ब्रेक लावला आहे. शिक्षण समितीचे सदस्य पारित प्रस्ताव फेरसादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी आणि महापालिका प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण समिती प्रयत्न करत आहे. त्यातलाच भाग म्हणून, महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये मानधनावर नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी, त्यांना उज्वल भवितव्य मिळण्यासाठी या शिक्षकांचा उपयोग होणार आहे. या नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांमुळे बालवयातच या विद्यार्थ्यांना नाट्यरंगभूमीवरुन व्यासपीठ मिळणार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी लागेल आणि महापालिका प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढून विद्यार्थी पटसंख्येत देखील वाढ होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मानधनावर नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करावी.

प्राथमिक शाळेतील सातवीतील विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करण्यात यावा. महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते दुसरीच्या 11 हजार 208 विद्यार्थ्याकरिता स्वच्छताकिट खरेदी करण्याचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सदस्यांनी पारित केले होते. अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविली होते. तथापि, स्थायी समितीने शिक्षण समितीच्या प्रस्तावांना ब्रेक दिला आहे. प्रशासनाने अभ्यास करुन हे विषय फेरसादर करावेत असे आदेश स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.