Pimpri: महापालिकेतील पाच पदांना सुधारित वेतनश्रेणीस मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर मंजूर असलेल्या विविध संवर्गातील एकूण पाच पदांचा सुधारित वेतनश्रेणीला मान्यता देण्यात आली आहे. या सर्व पदांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतनातील कोणताही फरक दिला जाणार नाही. तसेच 10 जून 2019 पासून या सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे या कर्मचा-यांच्या खात्यात वेतन जमा केले जाणार आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी दिलीप वणिरे यांनी त्याबाबत महापालिका प्रशासनाला आदेश दिला आहे. महापालिका आस्थापनावर विविध संवर्गातील पाच पदांना 2010 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली नव्हती. यामध्ये समाजविकास अधिकारी, कार्यव्यवस्थापक, उद्यान अधीक्षक, उद्यान अधीक्षक (वृक्ष) आणि वायरलेस इनचार्ज या पदांचा समावेश होता. त्याबाबत या कर्मचा-यांबरोबरच महापालिका प्रशासनाचा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरु होता.

  • या तांत्रिक अडचणींमुळे या पदावर कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचा-यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकिय अनुभव पाठिशी असनातादेखील हे कर्मचारी बढतीपासून वंचित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.