_MPC_DIR_MPU_III

Chichwad : क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे जागतिक योग दिन साजरा

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना आणि आपले चिंचवड व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. योग शिक्षक दिगंबर उसगांवकर, अनुजा उसगांवकर यांनी एक तास ओंकार मंत्र, प्राणायाम, सूर्यनमस्कार व इतर योगासनाचे धडे दिले. भुजंगासन, शीर्षासन, चक्रासन, झुलासन अशा विविध आसनांचे तसेच प्राणायाम, ध्यानधारणा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

21 जून म्हणजे जागतिक योगदिन. जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोरया गोसावी मंदिराच्या आवारातील उद्यानात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.

  • अण्णा भाऊ साठे आर्थिक विकाम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अ‍ॅड. सतीश गोरडे, उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, नितीन बारणे, नीता मोहिते, योग शिक्षक दिगंबर उसगांवकर, अनुजा उसगांवकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. सूर्यनमस्कार व भुजंगासन, शीर्षासन, चक्रासन, झुलासन अशा विविध आसनांचे धडे देण्यात आले. तसेच प्राणायाम, ध्यानधारणा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

अ‍ॅड. सतीश गोरडे म्हणाले, “जागतिक योग दिन हा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून सुरु झाला आहे. सन 2015 ला संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेत बहुमताने ठराव मंजूर करून 21 जून हा पहिला ‘जागतिक योग दिन’ म्हणून जगभरात सुरू झाला आहे . क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती गेली 5 वर्षे हा उपक्रम राबवत आहे. केवळ वर्षातून एकदा हा कार्यक्रम न घेता दैनंदिन योग साधना घेतली जाते”

_MPC_DIR_MPU_II
  • अमित गोरखे म्हणाले, ”शरीर, मन व बुद्धी यांच्या एकात्मिकरणाद्वारे अंतर्गत क्षमता जाणून घेण्याचे साधन म्हणजे योग. योगमुळे आपल्याला दैनंदिन जीवनातही अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होते. योगामुळे आपले आरोग्य सुधारते, कल्याणाची जाणीव होते व वैश्विक मूल्यांप्रती संवेदनशीलता वाढते. योगाभ्यास केल्यास आपण निरोगी राहून चांगले जीवन जगू शकतो”.

योग शिक्षक दिगंबर उसगांवकर, अनुजा उसगांवकर यांनी एक तास ओंकार, प्राणायाम, सूर्यनमस्कार व इतर योगासनाचे धडे शिकवले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन समितीचे सदस्य आसाराम कसबे यांनी केले. गजानन चिंचवडे यांनी आभार मानले.

  • यावेळी मुख्याध्यापक नटराज जगताप, जगन्नाथ देवीकर, अश्‍विनी बावीस्कर, शिक्षिका वनिता वकरे, मंजुषा गोडसे, प्रमोदिनी वकरे, वीणा तांदे, सरला पाटील, अंजली सुमंत, शुभदा साठे, शिक्षक मुधाकर हांडे, दादासाहेव खेडकर,अतुल आडे, पंडीत गायकवाड आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.