Pimpri : कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय संकटात; रिक्षा चालक- मालकांची सरकारी मदतीची मागणी

एमपीसी न्यूज : देशात कोरोनाच्या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकाराने २१ दिवसांचा लोकडाऊन लागू  केल्यामुळे रिक्षा व्यावसाय संकटात  आला  आहे. त्यामुळे रिक्षा चालक- मालकांना सरकारने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी हिंद रिक्षा संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण जगासह देशात आणि राज्यातील जनता कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशभर लोकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक सेवा ठप्प आहे. परिणामी रिक्षा व्यवसाय पूर्णतः संकटात सापडला असून, रिक्षा चालक- मालक यांना घरखर्च भागविणे मुश्किल झाले आहे.

त्यात दैनंदीन खर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते, घरभाडे यासाठी पैसे कुठून आण्याचे, असा प्रश्न सतावत आहे. या संकटातून वाचविण्यासाठी रिक्षा चालक-मालक यांना सरकरने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1