Pimpri: रिक्षा चालक-मालकांची दिवाळी झाली गोड!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो रिक्षा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थांच्या वतीने बोनस, कपडे आणि मिठाई वाटप करून रिक्षा व्यावसायिकांचे नेतेे बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांसोबत दिवाळी साजरी केली. 

 

रिक्षाचालक अत्यंत दुर्लक्षित घटक असून काही रिक्षाचालकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्व रिक्षाचालक बदनाम जीवन जगत असून समाजाच्या रोषाचे आणि आणि आर्थिक मंदी ,ओला उबेर, मुक्त रिक्षा परवाना, पेट्रोल आणि सीएनजी चे वाढलेले दर अशा विविध प्रश्न मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीमध्ये आला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांची आर्थिक बिकट अवस्था असून आर्थिक अडचणीमुळे रिक्षाचालकांच्या घरात दिवाळीत दिवा जळत नसून गोड मिठाई मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो रिक्षा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्था रिक्षाचालकांच्या मदतीला धावून आल्या असून त्यांच्या मदतीने रिक्षाचालकांची दिवाळी गोड झाली.

 

दिवाळीनिमित्त 200 रिक्षाचालकांना पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील यांच्या हस्ते बोनस, कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आले. त्यावेळी उद्योजक नितीन ठक्कर , दौलत चौधारी, पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे , सचिव प्रल्हाद कांबळे, पिंपरी विभाग अध्यक्ष इक्बाल शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळवे आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी विभागाच्या वतीने पिंपरी येथील भक्ती- शक्ती हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांसोबत दिवाळी साजरी केली.

 

_MPC_DIR_MPU_II
बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षाचालक अत्यंत दुर्लक्षित घटक असून या घटकांना दिवाळीनिमित्त कोणत्याही सुविधा मिळत नाही. त्यामुळे पंचायत विभागाच्या वतीने एक वर्षापूर्वी रिक्षाचालक-मालकांचा बचत गट स्थापन करण्यात आला होता. बचत गटामध्ये रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात जमा केलेल्या रकमेतून रिक्षाचालकांची दिवाळी गोड झाली आहे.

 

या उपक्रमामुळे रिक्षाचालकांच्या घरात दिवाळीनिमित्त आनंद साजरा होत असून हा उपक्रम  पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र  राबविण्यात येणार आहे, असे बाबा कांबळे यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या फंडासाठी दहा हजार रुपये जमा झाले. ही रक्कम फंड प्रमुख साहेबराव काजळे यांच्या जमा करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दत्ता भोसले, गिरीश साबळे, साहेबराव काजळे, सदाशिव वाघमारे, अनिल कांबळे, फारुख खान, गोविंद पवार, सुदाम रावळकर, राजू तामचीकर, विक्की भाट यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.