Pimpri : ‘रिंगरोड’ बाबत जनहिताचा निर्णय घ्यावा’ 

घर बचाव संघर्ष समितीचे प्राधिकरण अध्यक्षांना साकडे

एमपीसी न्यूज – प्रस्तावित 30 मीटर रिंगरोड प्रकल्पामुळे सुमारे पस्तीस हजारपेक्षा जास्त रहिवाशी घरे बाधित होणार आहेत.  याबाबत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने नरमाईची भूमिका घ्यावी. रिंगरोड बाबत जनहिताचा निर्णय घ्यावा. त्यादृष्टीने पाऊले उचलावित असे साकडे घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना घातले आहे.

संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक उमाकांत सोनवणे, अमरसिंग आदियाल, नारायण चिघळीकर, माणिक सुरसे, राजू गायकवाड, योगेश इरोळे, रविंद्र पवार, बाळासाहेब उबाळे, हनुमंत पवार, संतोष ठाकूर, शिवाजी ईबितदार, राजेंद्र देवकर, माऊली जगताप, मोहन भोळे, दिलीप मोरे, अशोक वडमारे, तानाजी जवळकर, विशाल बाविस्कर, रणजीत सिंग, अन्वर मुल्ला, मंतोष सिंग, प्रीतम पवार, विजय मुनोत, संतोष चव्हाण, शुभम वाघमारे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले, ‘कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नक्कीच सकारात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जाईल. याकरिता कायदा तज्ज्ञ, समिती समन्वयक, प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठकीचे नियोजन केले जाईल. अनेक वर्षापासूनचा सदरचा प्रलंबित प्रश्न मिटवण्यासाठी अध्यक्ष या नात्याने मी नक्कीच प्रयत्न करत राहील’

मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले, ‘1995 च्या कालबाह्य प्रकल्पामध्ये महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 37 अन्वये, गौण फेरबदल होऊ शकतात. तसेच पर्यायी मार्गाने रस्ता वळविल्यास गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या विभागातील एकही घर पडणार नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे व गरजेचे हनन होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी रिंगरोड बाबत खोटे आणि चुकीचे वक्तव्य करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. पिंपळेगुरव परिसरात सुद्धा शेकडो घरे बाधित होत आहेत. योग्य तोडगा निघाल्यास नागरिकांच्या घरावर हातोडा पडू शकणार नाही, असे अमर आदियाल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.