Pimpri : क्षणात रुग्णवाहिकेसाठी कार्यकर्त्यांनी केला रस्ता मोकळा !

एमपीसी न्यूज – मिरवणुकीची धामधूम सुरु असतानाही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी मधील प्रचंड गर्दी असलेल्या परिसरात अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

पिंपरी मधील श्री नवचैतन्य मंडळाची मिरवणूक मुख्य बाजारातील शगुन चौकात आली. मंडळाच्या ढोल-ताशा पथकाने कला सादर करण्यास सुरुवात केली. इतक्यात अचानक डीलक्स चौकाकडून रुग्णवाहिका आली असता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. ढोल ताशाच्या गजरात सुरू असलेल्या मिरवणुकीतही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घेतलेली पाहायला मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.