Pimpri : घरफोडी करणा-या सराईत चोरट्यास अटक; तीन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट दोन’च्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, चिंचवड आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुनील मल्हारी तलवारे (रा. कान्हे फाटा, वडगाव मावळ. मूळ रा. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीची नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे कुलूप तोडून घरातून 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी चिखली येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुनील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी, चिंचवड आणि वडगाव मावळ येथे गुन्हे केल्याचे सांगितले. त्याच्याकडून दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, चिंचवड आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक निलपत्रेवार, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप चौधरी, संजय पंदरे, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, केराप्पा माने, वसंत खोमणे, उषा दळे, विपुल जाधव, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.