Pimpri: रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे कामगारांना फूड किट्चे वाटप

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत स्थलांतरित झालेल्या संभाजीनगर, कस्तुरी मार्केट येथील कामगारांना रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे गुरुवारी (दि.23) अन्नधान्यांच्या किटचे वाटप करण्यात आले. 100 किटचे वाटप केल्याची माहिती अध्यक्ष जिग्नेश आगरवाल यांनी दिली.

यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, गुल सिवलानी, नवीन आगरवाल आदी उपस्थित होते.

रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल म्हणाले, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. हातावर पोट असणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून कामगार पिंपरी-चिंचवड शहरात उपजीविकेसाठी आले आहेत.

या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे कामगारांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पाच किलो पीठ, तीन किलो तांदूळ, एक किलो दाळ, मीठ, मसाला असे कीट तयार कामगारांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.