Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणने शिवदुर्ग संस्थेस दिली उपयोगी साधने

एमपीसी न्यूज – लोणावळा येथे शिवदुर्ग मित्र ही संस्था १९८० पासून सुरु करण्यात आली. डोंगर, दरी, पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी त्यांचे जीव वाचविण्यासाठी बचाव कार्य सुरु केले. यामधुन अनेक लोकांचे जीव वाचविण्यात या संस्थेला यश मिळाले. या त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा विविध शहरांतून उमटला गेला. या संस्थेच्या सामाजिक कार्याला थोडासा हातभार लावण्याच्या हेतुने रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांनी शिवदुर्ग मित्र संस्थेला उपयोगी साधने देण्यात आली.

निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमध्ये हा कार्यक्रम झाला. यामध्ये रोप, टेप, स्लिंग्ज, कॅरॅमिनर, पुलीज अशा साधने त्यांना देण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्य व रोटरीयन उपस्थित होते.

  • या उपक्रमाची माहिती देताना वैजयंती आचार्य म्हणाल्या, शिवदुर्ग ही संस्था किल्ले संवर्धन, किल्ले भ्रमंती, गिर्यारोहण, किल्यांवरील स्वच्छता मोहिम, दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय वाटप मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर, साहस क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण, बेवारस व भटक्या जनावरांसाठी औषधोपचार व रेस्क्यू सेटरची सुविधा, शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण, सांस्कृतिक विभाग, सायकलिंग असे अनेक उपक्रम ही शिवदुर्ग संस्था करीत आहे.

त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा म्हणून रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणने उचलला. व त्यांना महत्वाची साधने भेट दिली. यावेळी संस्थेच्या या सामाजिक कार्यासंबंधीची माहिती गणेश गीध, ओंकार पडवळ, राहुल गेंगजे यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.