Pimpri : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे अन्नदान

दहा हजार भाविकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले असून पालखी आकुर्डी मुक्कामी विसावली आहे. पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी रोटरी कल्ब ऑफ निगडी आणि जय बजरंग तरुण मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आले. सुमारे दहा हजार भाविकांनी याचा लाभ घेतला.

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरीत आज उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत आहे. उद्या (बुधवारी) पालखी पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे.

  • पालखीतील वारक-यांसाठी रोटरी कल्ब ऑफ निगडी आणि जय बजरंग तरुण मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने निगडीतील हनुमान मंदिर येथे अन्नदान करण्यात आले. सकाळपासून वारक-यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजार वारक-यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मोफत पाणीपुरवठा करण्यात आला.

यावेळी जय बजरंग तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक दत्तानाना पवळे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे पदाधिकारी विजय काळभोर, केशव मनगे, अनिल कुलकर्णी, सुहास ढमाले, प्रणिता अल्लूरकर, शेखर घिलपेलवार, प्रमोद देशमुख, राकेश सिंघानिया, रवी राजापूरकर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.