Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या दोन कुटुंबाना दीड लाखांची मदत

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा येथील दोन जवानांच्या कुटुंबाला प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष सिंघानिया यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आता रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने बुलढाणा येथील जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

  • संजय राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमा आणि नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना यांनी धनादेश स्वीकारला. प्राधिकरण येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, हरबिंदर सिंग दुलट , कमलजीत कौर दुलट, धर्मवीर चड्डा,विनिता सिंगानी,गुरूदीप सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष सिंघानिया म्हणाले की, सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.