Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे वाहतूक पोलिसांना ‘निवारा’

एमपीसी न्यूज – वाहतूक व्यवस्थेचे कर्तव्य बजावत असताना ऊन, वारा, पाऊस यांपासून बचाव होण्यासाठी वाहतूक पोलिसांसाठी शहरात रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने स्वतंत्र असा निवारा (शेल्टर) चौकाचौकात उपलब्ध करुन दिला आहे.

रविवार (दि. 26 मे रोजी) दापोडी येथील चौकात शेल्टर बसविण्यात आले. या शेल्टरचे उदघाटन जिल्हा प्रांतपाल शैलेश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, सर्व्हिस डायरेक्टर रो. गुरुदीप भोगल, सुभेदार मेजर दत्तात्रय साळुंके, समन्वयक अधिकारी संतोष माने आदी रोटरीयन सदस्य उपस्थित होते

  • स्मार्ट सिटीकडे झेपावत असताना वाहतूक पोलीस मागे राहू नयेत म्हणून त्यांच्या सोयीसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीने सुरक्षित केबिन बनवले आहे. हे केबिन शहरातील निगडी ते दापोडी दिशेच्या मार्गावर टिळक चौक, बजाज चौक आकुर्डी, खंडोबा माळ चौक, सीझन मॉल, काळभोरनगर, जयश्री टॉकीज, चिंचवड, महावीर चौक, खराळवाडी, एच. ए. कंपनी, मार्शल कंपनी, अॅटलास कॉप्कोे कंपनी, मॅक्स सेंटर, ठाकरे शाळा फुगेवाडी, दापोडीतील भाई कोतवाल चौक असे एकूण १४ शेल्टर बसविण्यात आले आहेत.

तसेच दापोडी ते निगडी दिशेने जाणाऱ्या मार्गावर दापोडी, फुगेवाडी नाका, सॅन्डविक, कंपनी, वल्लभनगर बसस्टॉप, डॉ. आंबेडकर चौक, मोरवाडी चौक, सिटीवन मॉल, चिंचवड स्टेशन, जयश्री टॉकीज, काळभोरनगर, सिझन मॉल, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी चौक, बजाज ऑटो कंपनी अशा चौकांमध्ये १४ असे असे एकूण २८ शेल्टर बसविण्यात आले.

  • याबाबत अध्यक्ष सुभाष जयसिंघानी म्हणाले, “निगडी ते दापोडी मार्गात बीआरटी मार्गातील प्रवास सुखकर व जलद होण्यासाठी ट्रॉफिक वॉर्डन वाहतूक कर्तव्य बजावतात. त्यांना उन्हातच बारा तास उभे राहून कर्तव्य पार पाडावे लागत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांना उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात येत नाही. सुविधेअभावी ट्रॉफिक वॉर्डनची गैरसोय होत होती.

बीआरटी मार्गात बसायला खुर्ची नाही, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ निगडीने सुरक्षा रक्षकांना प्रोटेक्शन बुथ देऊन सावली दिली आहे. या बुथद्वारे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, ‘पाणी वाचवा’, ‘हेल्मेटचा वापर करा’ असे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ निगडीने केला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.