-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : रोटरी क्लबच्या मोफत सिटी स्कॅन सुविधा केंद्राचे उदघाटन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ़ निगडी, रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन आणि एनप्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी मोरया रुग्णालयात सुरू केलेल्या मोफत एनप्रो-रोटरी सिटी स्कॅन सेंटरचे उदघाट्न झाले असून ते नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रांतपाल रवी धोत्रे, विजय काळभोर, सचिव प्रणिता आलूरकर, एनप्रोचे व्यवस्थापकीय संचालक रोटे श्रीकृष्ण करकरे, सीए रवी राजापूरकर, मोरया रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. गिरीश आफळे, डॉ संजय देवधर आदी उपस्थित होते.

समाजाला सुविधा देताना शासन आणि मनपा प्रशासनावर ताण येत असतो. मात्र रोटरीसारख्या सामाजिक संस्था समाजात असल्याने समाजसेवा करणे शक्य आहे, असे आयुक्त हर्डीकर याप्रसंगी म्हणाले. कंपनीचे कर्मचारी व सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी औद्योगिक क्षेत्रावरही आहे. केवळ कर भरणे हेच कर्तव्य नाही. दान करणे सोपे पण दिलेले दान सत्कर्म लावणे अवघड असते, असे प्रतिपादन करकरे यांनी केले. अध्यक्ष विजय काळभोर म्हणाले की, पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना पूर्णपणे  सीटी स्कॅन मोफत सेवा दिली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.