Pimpri : राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांच्या हत्येच्या कट प्रकरणी आरपीआयच्या शहाराध्यक्षाला अटक

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी चिंचवड शहाराध्यक्षाला पिंपरी पोलिसांनी अटक केली.

सुरेश निकाळजे असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी हा रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) शहराध्यक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या हत्येचा आरपीआयच्या शहाराध्यक्षाने कट रचला. याबाबत डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी करून पोलिसांनी कलमवाढ करून गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी निकाळजे याला अटक केली. न्यायालयाने निकाळजे याला चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.