Pimpri : आरपीआयच्या अल्पसंख्याक आघाडीत वाढले सक्रीय कार्यकर्ते

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) अल्पसंख्याक आघाडी पिंपरी-चिंचवडमध्ये तीनशे कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. पक्ष बांधणीसाठी अनेक कार्यकर्ते पक्षांत सक्रीय झाले असून पक्षाची ताकद वाढणार आहे. नवीन नियुक्त्या केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्ष बांधणी चालू आहे.

अल्ताफभाई शेख, कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, महिला शहर अध्यक्ष रशिदा खान यांच्या नेतृत्वाखाली ही पक्ष बांधणी सुरु आहे. या पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांमुळे आरपीआयला पक्षाला नवचैतन्य आले असल्याचे मत शहराध्यक्ष अल्ताफभाई शेख यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरात अध्यक्ष अल्ताफभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात येणार आहे.

  • यावेळी विविध भागांत विविध पदनियुक्त्या करण्यात आल्या. जाधववाडी वॉर्ड (चिखली) – अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष सागर खळगे, संपर्क प्रमुख – बाळासाहेब गायकवाड. नेहरुनगर वॉर्ड पिंपरी- अध्यक्ष जनाब अल्ताफ सेख, उपाध्यक्ष जावेद तांबोळी. मोशी वॉर्ड (पिंपरी) – अध्यक्ष – जनाब हबीब सय्यद, उपाध्यक्ष – जनाब अय्युब शेख, सरचिटणीस – जनाब शकील शेख, संपर्क प्रमुख – आकाश शिंदे. च-होली वार्ड अध्यक्ष – रोहन माळी.

भोसरी विधानसभा उपाध्यक्ष – वैभव वाघमारे, संपर्क प्रमुख – आसिफ शेख. भोसरी वॉर्ड महिला आघाडी उपाध्यक्षा – कल्पना खांदवे, सरचिटणीस वनीता शिंदे, वर्षा काशीद. चिंचवड विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा – सोनी शिरसाठ. पिंपरी विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा पद्ममा सुवर्णा, सरचिटणीस – मनीषा खुडे, संपर्क प्रमुख – शोभा सराटे. भोसरी वॉर्ड – अध्यक्ष – राजेश जयस्वाल.

  • भोसरी विधानसभा महिला आघाडी – सरचिटणीस डॉ. फरहद, उपाध्यक्ष वनिता निर्मल, सरचिटणीस – कविता कोरगावकर, संपर्क प्रमुख – रत्नमाला माने. पिंपरी-चिंचवड शहर – उपाध्यक्ष सुरेश कांबळे. कुदळवाडी वॉर्ड (चिखली) – अध्यक्ष – अर्शद खान. अल्पसंख्याक आघाडी – संघटक प्रमुख – मुर्तजा चौधरी तसेच पिंपरी-चिंचवड अल्पसंख्याक आघाडीमध्ये पदाधिकारी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष – विनोद गायकवाड, सरचिटणीस – जनाब जिलानी भाई सय्यद, उपाध्यक्ष – सालिम सय्यद यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.