Pimpri Crime News: भंगारचे दुकान फोडून 20 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी

ही घटना 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी पुलाखाली अंजनी प्लास्टिक अँड स्क्रॅप सेंटर या दुकानात उघडकीस आली.

एमपीसी न्यूज – भंगाराच्या दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून इन्व्हर्टर बॅटरी, इन्व्हर्टर, लोखंडी प्लेट आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी पुलाखाली अंजनी प्लास्टिक अँड स्क्रॅप सेंटर या दुकानात उघडकीस आली.

लालाराम रामजी चौधरी (वय 60, रा. कामगार नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे पिंपरी पुलाखाली अंजनी प्लास्टिक अँड स्क्रॅप सेंटर नावाचे भंगारचे दुकान आहे. त्यांचे दुकान 22 जून पासून 6 ऑगस्ट पर्यंत बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातून आठ हजार रुपयांचा एक अक्साईड कंपनीची इन्व्हर्टर बॅटरी, लुमिनस कंपनीचा इन्व्हर्टर, दोन हजारांच्या लोखंडी प्लेट आणि आठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.