Pimpri: शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 50 कोटींचा खर्च!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील तीन वर्षापासून शहरातील रस्ते काँक्रीटीकरणावर मोठा भर दिला आहे. शहरातील विविध भागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 49 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

प्रभाग क्रमांक 23 मधील थेरगाव गावठाण परिसरातील अंतर्गत गल्ल्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 कोटी 25 लाख रुपये खर्च येणार असून आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून काम करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील मोरया हॉस्पीटल ते यशोपुरम ब्रिज, लिंक रोड अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 95 लाख रुपये खर्च येणार आहे. एस.के. येवले अॅन्ड कंपनी या ठेकेदारामार्फत हे काम करुन घेतले जाणार आहे.

प्रभाग क्रमांक 21 पिंपरीतील शास्त्री गार्डन आणि इतरपरिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी 87 लाख रुपये खर्च येणार आहे. जे.पी.इंटरप्रायझेस ठेकेदाराकडून काम करुन घेण्यात येणार आहे. पिंपरीतील एच.बी.ब्लॉक आणि इतर परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ कोटी 30 लाख रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून काम करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक 31 मधील कृष्णा चौक ते साई चौक रस्ता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने विकसित केला जाणार आहे. त्यासाठी चार कोटी 13 लाख रुपये खर्च येणार आहे. साईप्रभा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून हे काम करुन घेण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील गल्ल्यांमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ कोटी 7 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. एस.एस.साठे या ठेकेदाराकडून हे काम करुन घेतले जाणार आहे.

त्याचबरोबर पिंपळेनिलख येथील उद्यानाची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन कोटी 95 लाख रुपये खर्च येणार आहे. बीव्हीजी या ठेकेदाराकडून काम करण्यात येणार आहे. तसेच थेरगावातील बोट क्लबचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 24 लाख रुपये खर्च येणार आहे. चैतन्य एंटरप्रायजेस यांच्याकडून हे काम करुन घेण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षी शाहू उद्यानाचे पुर्नविकास केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 66 लाख रुपये खर्च येणार आहे. विशाल पांचाळ या ठेकेदाराकडून याचे काम करुन घेण्यात येणार आहे. पिंपरीतील 162 क्रमांकाचे आरक्षण विकसित केले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी 49 लाख रुपये खर्च येणार आहे. त्याचे काम बी.पी. सांगळे कन्स्ट्रक्शन यांच्याकडून करुन घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.