Pimpri: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

एमपीसी न्यूज – विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीप्रमाणे आज (मंगळवारी) शहरात पथसंचलन केले. पिंपरी-चिंचवडच्या 19 नगरातील 10 ठिकाणी पथसंचलन झाले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील 19 नगरातील 10 ठिकाणच्या विविध भागातून संचलन नेण्यात आले. हातात काठ्या घेतलेले गणवेशधारी स्वयंसेवक, शिस्तबद्ध संचलन पहायला मिळाले. पिंपळेगुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड नगरातील देहूरोड येथील विकासनगर, निगडीतील रूपीनगर, चिखलीतील पूर्णानगर, खराळवाडी, पिंपरी, पिंपळेगुरव, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवडगाव या भागात पथसंचलन झाले. सभागृह नेते एकनाथ पवार पथसंचलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.