Pimpri: दापोडी-निगडी मार्गावरील वाहनचालकांनी ‘ही’ दक्षता घ्यावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावर शुक्रवारपासून पीएमपीएमल बस सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांनी रस्त्याचा वापर करताना दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महापालिका, पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटीएस बस सेवा सुरु केली आहे. हा बीआरटीएस मार्ग 12.5 किलो मीटर लांबीचा आहे. या मार्गावर एकूण 36 बस स्टेशन्स उभारण्यात आलेले आहेत. बीआरटीएस बससाठी 3.50 मीटर रुंदीची स्वतंत्र मार्गिका बांधण्यात आली आहे. या रस्त्यावर मध्यभागी Express Lane असून विविध ठिकाणी आठ चौक, पाच ठिकाणी सब-वे, 21 मर्ज इन, मर्ज आऊट तसेच चौकांचे ठिकाणी, मर्ज इन, मर्ज आऊट या ठिकाणी पादचारी व वाहतुकीचे सुरक्षिततेचे दृष्टीने आयआयटी मुंबई यांनी सुचविल्याप्रमाणे, वाहतूक नियंत्रण दिवे, पादचारी मार्ग, झेब्रा मार्किंग तसेच विविध माहितीदर्शक सूचना फलक बसविण्यात आलेले आहेत.

या व्यतिरिक्त वाहतूक नियमन करण्यासाठी सर्व मर्ज इन, मर्ज आऊट, सबवे आणि चौकांमध्ये देखील ट्रफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आलेली आहे. या रस्त्यावरील वाहनचालकांनी रस्त्याचा वापर करताना खालील प्रमाणे दक्षता घ्यावी.

निगडी ते दापोडी

मर्ज इन – बजाज टेंपो समोर आकुर्डी, चर्च समोर चिंचवड, डी मार्ट जवळ चिंचवड, अल्फा हॉटेल समोर खराळवाडी, पेट्रोलपंप समोर कासारवाडी.

मर्ज आऊट – फॉर्मायका समोर निगडी, स्टार बाझार समोर काळभोरनगर, महाराष्ट्र बँक समोर मोरवाडी, हाफकिन समोर वल्लभनगर, जुना जकात नाक्यासमोर फुगेवाडी

दापोडी ते निगडी

मर्ज इन- अँटलास कॉपको समोर कासारवाडी, दीपक आर्टस समोर खराळवाडी, बिग बाझार जवळ चिंचवड, क्रॉम्प्टन ग्रीव्हस समोर चिंचवड.

मर्ज आऊट- जुना जकात नाका समोर फुगेवाडी, एच.ए. कंपनी समोर पिंपरी, स्टर्लिंग होंडा समोर मोरवाडी, बॉम्बे सिलेक्शन जवळ चिंचवड, प्राधिकरण कॉर्नर निगडी

केलेल्या उपाययोजना – गिव्ह वे, मर्ज इन/मर्ज आऊट, ओन्ली बीआरटी इत्यादी सूचना फलक, रम्बल्ड स्ट्रिप्स, थर्मोप्लास्ट पट्टे, ब्लिंकर

वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी

मर्ज इन- सर्व्हिस रस्त्यावरुन एक्सप्रेसलेन मध्ये जाणा-या प्रवाशांनी उजव्या बाजुने येणा-या बीआरटीएस बसला प्राधन्य देऊन वाहनांची गती कमी करावी. बस गेल्यानंतर एक्सप्रेस लेनमध्ये प्रवेश करावा. जागेवरील वाहतुकीच्या सूचना फलकानुसार पालन करावे, ट्रॅफिक वॉर्डनची मदत घ्यावी.

मर्ज आऊट – एक्सप्रेस लेनमधुन सर्व्हिस सेवा रस्त्याला जाणा-या प्रवाशांनी डाव्याबाजुला जाणा-या बीआरटीएस बसला प्राधान्य देऊन गती कमी करावी. बस गेल्यानंतर एक्सप्रेस लेनमध्ये प्रवेश करावा. जागेवरील वाहतुकीच्या सूचना फलकानुसार पालन करावे, ट्रॅफिक वॉर्डनची मदत घ्यावी.

चौक – नाशिक फाटा, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, महावीर चौक चिंचवड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा माळ चौक, लोकमान्य टिळक चौक निगडी, भक्ती-शक्ती चौक निगडी,

घ्यावयाची काळजी- वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंगपूर्वीच थांबावे. बीआरटी सिग्नल चालू असल्यास बीआरटीला प्राधान्य देणे, बीआरटी सिग्नल चालू असताना यु टर्न/उजवीकडे वळण घेऊ नये. ट्रॅफिक वॉर्डनच्या सूचनांकडे दुर्लक्ष करु नये. ट्रॅफिक वॉर्डनची मदत घेणे.

सब वे – जुना जकात नाका फुगेवाडी, कुंदननगर, कासारवाडी, काळभोरनगर, बजाज ऑटो, आकुर्डी

घ्यावयाची काळजी- सेवा रस्त्यावरील वाहनचालकांनी रेज्ड स्पीड टेबल पूर्वी थांबावे. बीआरटी बसला प्राधान्य द्यावे. बीआरटीएस बस सिग्नल चालू असतांना यु टर्न/उजवीकडे वळण घेऊ नये. ट्रॅफिक वॉर्डनच्या सूचनांकडे दुर्लक्ष करु नये. ट्रॅफिक वॉर्डनची मदत घेणे. बस स्थानकामधुन बाहेर पडणा-या प्रवशांसाठी- पादचा-यांनी पादचारी मार्गिकेमधुनच चालावे. चौकाजवळच्या झेब्रा क्रॉसिंग वरुनच रस्ता क्रॉस करावा. सबवे जवळच्या रेज्ड स्पीड टेबल वरुन रस्ता क्रॉस करावा. पादचारी सिग्नलचा वापर करावा. सुरक्षारक्षक/ट्रफिक वॉर्डनच्या सूचनेचे पालन करावे. आवश्यक त्या ठिकाणी पादचारी सिग्नल आहेत. त्यांचा वापर करावा आवश्यकता भासल्यास तेथील ट्रॅफिक वॉर्डनची मदत घ्यावी.

पीएमपीएमएल चालक/वाहकांसाठी- बीआरटी सिग्नलचे पालन करावे. बस डॉकिंग व्यवस्थित करावे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे. वेग मर्यादा पाळावी.

वाहतूक पोलिसांसाठी – बीआरटीएस मार्गिकेमधुन खासगी वाहनांना प्रवेश देऊ नये. निगडी दापोडी रस्त्यावरील अनधिकृत केलेल्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियमन सुरळीत होईल असे नियोजन करावे.

मेट्रोसाठी- काम चालु करणे ठिकाणी मनपा व वाहतूक पोलिसांकडुन परवानगी अवश्य घ्यावी. काम चालू केलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणे मेट्रोची जबाबदारी राहील. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी जादा ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.