Pimpri: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

शंभर कोटी रुपयांची तरतूद करून लवकरच त्याची घोषणा करणार

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी जरूर पोहोचावा. कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता अर्थमंत्री या नात्याने मी घेईल. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर कोटी रुपयांची तरतूद करून लवकरच त्याची घोषणाही केली जाईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित गोरखे यांना दिले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी महत्वाच्या भेटीगाठी घेतल्या. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आर्थिकदृष्टया सक्षमीकरण करण्यासाठी तसेच अण्णा भाऊंच्या शंभराव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भर समाज प्रबोधनपर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उपक्रम राबविण्यासाठी शंभर कोटी रुपयांची मागणी महामंडळाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेऊन महामंडळाच्या सक्षमीकरण्यासाठी निधी देण्याची अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली होती.

  • त्यावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी जरूर पोहोचावा. कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता अर्थमंत्री या नात्याने मी घेईन. अण्णा भाऊंच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर कोटी रुपयांची तरतूद करून लवकरच त्याची घोषणाही केली जाईल, असे आश्वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्याचे महामंडळाचे अध्यक्ष गोरखे यांनी सांगितले.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशीही उपरोक्त विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनीही सकारात्मक पाऊल उचलण्याचे ठोस आश्वासन दिल्याचे गोरखे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.